Marathi Motivational Stories

Cinque Terre "जेरी आपल्यासाठी मराठी भाषेत वाचत आहे, फक्त परच्छेद निवडा..." Just select text

Story 1

एक तरुण मुलाखतीसाठी गेला होता... मुलाखत सुरु झाली . कंपनीचा एमडी ती मुलाखत घेत होता . मुलाखत चांगली झाली . शेवटचा प्रश्न म्हणून एमडीनं त्या तरुणाला विचारलं : "तुझं या कंपनीत येण्याचं उद्दिष्ट काय...??" तो म्हणाला : "मला तुमच्या खुर्चीवर बसायचं आहे...!!" एमडी म्हणाला : "अरे तू जर माझ्या खुर्चीत बसलास तर मी कुठे जाऊ...??" त्या तरुणानं या उत्तरावरच प्रतिप्रश्न केला : "तुमचं काहीच उद्दिष्ट नाही का...? आयुष्यभर इथेच एमडी म्हणून राहणार का...??" मुलाखत घेणारा अवाक होऊन पहातच राहिला...!! हा किस्सा सांगण्याचा उद्देश इतकाच की आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट हवंच, आणि तसं ते नसेल तर आजच निश्चितही करायला हवं...! त्यासाठी आपले विचार बदलायला हवेत, तरच आयुष्य बदलेल...!! ---------------

Story 2

गावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं. जत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागलं. बाबांकडे त्यानं बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली. पण त्याने हट्ट केला "बाबा.. माझ्याकले द्या". बाबांनी दिली. पुन्हा पुढं गेल्यावर त्याला खेळण्यातली ढोलकी दिसली. बाबांनी घेतली आणि त्यांच्या पिशवीत टाकली. आणि पून्हा मुलानं, " बाबा...मला दया". बाबांनी दिली. जरा पुढे गेल्यावर मुलानं खायला मागितलं. बाबांनी एक वेफर्सचं पॅकेट घेऊन त्याला दिलं. एव्हाना त्याचे दोन्ही हात भरले होते. बाबांनी त्याच्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण त्याने नाही दिली. पुढे आणखी फिरल्यावर त्याला आईस्क्रीम दिसलं. हट्ट करून त्याने ते सुद्धा घेतलं. पण हातातल्या इतर गोष्टी त्याला सोडवत नव्हत्या. दोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून तो चालू लागला. एका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता तो बाबांपासून कधी दूर जात हरवला ते त्यालाही नाही कळलं आणि बाबांनाही. त्या गर्दीत बाबा कुठे दिसत नाहीत, म्हणून ते हिरमुसलं झालं आणि जोरजोरात रडू लागलं. हातातली खेळणी आणि खाऊ फेकून जमिनीवर आडवं होऊन धाय मोकलू लागलं. इतर लोकांनी त्याला शांत करण्यासाठी खेळणी देऊ केली, पण त्याने ती फेकून दिली. आणि "बाबा... बाबा..." करत फक्त रडत राहिलं. आता त्याला फक्त त्याचे बाबा हवे होते... आपलं सुद्धा असंच होतं. पैसा, नाव आणि प्रसिद्धी हे आपल्या जीवनातील खेळणेच आहेत ते कमवायच्या नादात आपल्या माणसांचा हात कधी सुटून जातो, ते आपल्याला सुद्धा नाही कळत... *वेळेवर भान आलं तर ठीक, नाहीतर हीच माणसं इतकी दूर गेलेली असतात, कि उरल्या आयष्यात त्यांच्या केवळ आठवणीच आपल्याकडे उरतात......*

Story 3

*🤔वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर..,* त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील._ हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. *1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.* धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये. *2) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.* *3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.* *4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.* *5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.* *6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.* *7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.* *8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.* *9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.* *10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.* *11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.* *12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..* 🙏🙏🙏🙏🙏🙏 खरंच खुप छान आहे. आणि हि पोस्ट महत्वाची वाटली. लिहीणार्याला मनापासून धन्यवाद 🙏 _मला आवडली म्हणून मी इतरांशी शेअर केली_

Story 4

एका कार बनवणाऱ्या कंपनीतील एका इंजीनियरने एका वर्ल्ड क्लास लेवलच्या कारचे डिझायन तयार केले व कंपनीच्या मालकाला दाखविले. मालक खुप प्रभावित झाला व त्याने त्या इंजीनियर ला कार तयार करण्यास सांगितले. इंजीनियरने कार तयार केली. कार बघुन मालक खुश झाला. आता ट्रायल घेण्यासाठी कारला कारखान्याच्या बाहेर नेण्याचे ठरले. पण त्यांच्या लक्षात आले कि कारची उंची ( Height ) कारखान्याच्या बाहेर निघण्याच्या कमानाकृती गेटपेक्षा २ इंचाने जास्त आहे. इंजीनियर ला खुप वाईट वाटले. कारण कार तयार करताना त्याने ही गोष्ट लक्षात घेतली नव्हती. आता, कार बाहेर कशी न्यावी, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहीला. कारखान्याचा पेंटर म्हणाला, कारला आपण बाहेर नेवु शकतो, फक्त वरच्या भागावर थोडे ओरखडे पडतील, ते आपण कारला बाहेर नेल्यानंतर पुन्हा पेंट करुन मिटवु शकतो. इंजीनियर म्हणाला, त्यापेक्षा आपण हा गेट तोडुन टाकु. कार बाहेर नेल्यावर गेट पुन्हा बांधता येईल. पण मालक कोणत्याही कल्पनेने आश्वस्त होत नव्हता. त्याला ओरखडे पडणे किंवा तोड-फोड हे शुभ शकुन नाही असे वाटत होते. दुर उभा असलेला कारखान्याचा चौकीदार हे सर्व बघत होता. तो हळुच त्यांच्याजवळ आला व म्हणाला, मी काही सुचवु शकतो कां ? सर्वांना आश्चर्य वाटले, कि येथे इतक्या तज्ञ लोकांना उपाय सापडत नाहीय व हा सामान्य चौकीदार काय उपाय सुचवणार ? चौकीदार म्हणाला,,,, *"कार गेटपेक्षा फक्त २ इंच उंच आहे.* *साधी गोष्ट आहे,चारही टायर्स मधील* *हवा थोडी-थोडी कमी करा,* *कारची उंची कमी होईल व* *कारला बाहेर सहज नेता येईल....!* सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या !!! *मित्रांनो,,,,* *प्रत्येकच समस्येचे समाधान* *तज्ञाच्या नजरेतुन विश्लेषण केल्यानेच मिळते असे नाही !* *कधी-कधी एखादा सामान्य व्यक्तीसुद्धा आपल्या समस्येचं निराकरण करु शकतो.* *जीवनातील समस्यांचं देखील काहीसं असंच असतं......*

Story 5

*मुलिंनो लग्न करताना,,* ********************** *1. मुलगा नोकरीत आहे का..?* *2. हजारो रुपये पगार आहे का?* *3. रहायला प्लॅट आहे का?* *4. कार आहे का?* *5. बॅक बॅलन्स किती आहे?* *6. मुलगा एकुलता एक आहे का?* *ह्या गोष्टी सर्रास विचारतात.* *पण त्या कधीही हा विचार करत नाहीत की* *,स्वत:चा बाप 20 - 25 वर्ष शहरात राहुन एक झोपडं खरेदी करू शकला नाही,* *कधी रिक्षाने स्टेशनला गेला नाही. अजुन भाड्याच्या खोलीत राहतो. मग हा काल आलेला किंवा नुकताच नोकरीला* *लागलेला मुलगा लगेच एवढ्यासगळ्या अपेक्षा कसा पुर्ण करु शकतो...?* *नाही ना करू शकत....* *स्वत: कधी साधा वडापाव वर खर्च केला नाही आणि मुलाकडून* *बर्गर ची अपेक्षा कशी ठेवावी ?* *खरच सुखी संसार मिळवायचा असेल तर मुलगा स्वभावाने कसा आहे हे पहा* *नाही तर जे मिळतय ते पण गमावण्याची वेळ येते.* *कितीही बरी परिस्थिती असली मुलाची तरी मुलीला ते कमी लायकीच वाटते आणि उगाच आपल्या सासरला कमी लेखतात.* *खरच ज्याच्याशी लग्न करायचय त्याच्यावर विश्वास ठेवा.* *त्याच्या चांगल्या वाईटात त्याला साथ करा.* *तो पैसे कमावण्याची मशिन नाही* *की हातातले काम टाकून तुमच्या बरोबर सतत फिरायला तो काही अबांनीचा पोरगा नाही,* *पण एक नक्की कि* *"खरच एक दिवस तो तुमच्या* *स्वत:च्या हिंमतीवर कमीत कमी* *60% तरी अपेक्षा नक्की पुर्ण करेल. तुम्ही पण खुश रहाल आणि तो पण....* *उगाच अती अपेक्षा करणे चुकिचच.....* ***** *या पोस्टचा बर्याच मुलीना राग येईल. पण काही बाबी यातील नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत, हे नक्की.* *राग मानू नका...* ********* *अती हव्यास झाला कि हातात जे आहे तेही निसटून जात !! हे लक्षात घ्या ! मुख्य म्हणजे जर* *तुम्हाला "अभिषेक बच्चन" हवा असेल तर त्यात वावगे काही नाही पण तुम्ही आधी स्वतः "ऐश्वर्या"* *आहेत का हे स्वतःला तपासून पहा ! कधी इतके शृङ बोलत नाही ! पण* *गरज आहे. म्हणून बोलतोय. नुकतेच एक मुलीचे पालक येऊन भेटून गेले. त्यांचे हेच दुखणे* *होते ! म्हणून विचार केला कि हा प्रश्न सार्वत्रिक असू शकेल म्हणून इथे मांडला* *हि पोस्ट पालकांनी शेयर करायला हरकत नाही ! किमान इतरांच्या मुली नक्की विचार करतील.........

Story 6

*नवरा बायको ते आई आणि बाप..* स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यन्त ती नवर्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी असो की ठसनी ! जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहीजे ते मुलांना खायला देते, नवर्याच्या चोरून मुलांना पैसे पुरविते , साहजिकच मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात. बर्याच परीवारात मुलं तरुण झाले, की बापाशी बोलत नाहीत. त्यांना जे मागायचं ते आईमार्फत वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात, तीला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात. काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात. मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात. आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये . की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य बर्बाद होतं. मुलं विस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा! आणि ते साहजिक आहे पण या कौतुकासमवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात. ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात. मग मुलावर बापाचा वचक राहत नाही . *मुलांना आई चांगली वाटते,* *व बाप वैरी वाटायला लागतो.* वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो . मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली,नीतीवान ,शीलवान ,बलवान बनावे . चांगल्या लोकांमधे उठावे बसावे , सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा , अशा कितीतरी मानवी जिवन जगण्याच्या गोष्टी त्यांनी अचूकपणे कराव्या , यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो, मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक हेतू असतो, मुलाच्या हातून काही चूकीचं घडू नये असं बापाला वाटते म्हणून तो आपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही. पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही . *बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत* अशा परीस्थीतीत माणूस खिन्न होतो , त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही . ती असं कधीच म्हणणार नाही की, "बाऴा,तुझे वडिल तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात.ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं करतात. ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना ?" उलट ,अनेक आई म्हणतात (मुलांच्या समोरच ) " बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला , घरात आले की सुरु होता, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्याचे मित्र बनायला पाहीजे तुम्ही, पण नाही ...लेकरांत जिवच नाही ना तुमचा ! कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्याच्याशी .... अशाप्रकारे ,आई नवर्याचा मुलांसमोर पाणउतारा करते . आणि मीच तुला समजून घेते, मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्वकाही करते, असा मात्रुत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आव आणते. *साहजिकच सतत हँमरिंग होऊन मुलं बापापासून दूर जातात.* तीच मुलं लग्नानंतर पत्निप्रेमात तल्लीन झाल्यावर, आईला विचारतही नाहीत. *म्हणून वेळेचं भान ठेवा.* *मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे पण त्यांना घडवतांना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा.* *कायम लक्षात ठेवा...* *लहानपणी बापाचा हात धरला,* *तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही* *बाप हाच बापमाणुस असतो..* *पटलं तरच शेअर करा.......

Story 7

*एक सुंदर बोधकथा...* तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती. तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं. पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली. तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले. तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका." तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं? समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास... पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी... पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना. शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता. शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती. त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली. आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. *"विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच"* आणि तो पुढे निघाला. *----तात्पर्य--* *ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी. *काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी.* *काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.* *त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते.* *आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.* *काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली.* *या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.* *त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या*

Story 8

*आजची बोधकथा* एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले. *पशुवैद्य* : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ? *मुलगा* : हो *पशुवैद्य* : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ? *मुलगा* : हो. *पशुवैद्य* : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ? *मुलगा (अतिशय आश्‍चयाने)* : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे ! *पशुवैद्य* : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ?? आणि म्हणून गेली कित्येक दिवस ऊपाशी राहुन पोटात तुझ्यासाठी जागा करत आहे ... *या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासोबत सतत असतात, ज्यांच्यासोबत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ....जरा सांभाळून !* *तात्पर्य* : माणसे ओळखायला शिका ,कारण ती काळाची गरज आहे!!!

Story 9

*अदृश्‍य पेरू:-* एका सात वर्षाच्‍या मुलीला एक शिक्षक गणित शिकवित होते. त्‍यांनी तिला प्रश्‍न विचारला,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलीने काही काळ विचार केला आणि बोटे मोजत उत्तर दिले,'' चार पेरू'' शिक्षक आश्‍चर्यचकित झाले, त्‍यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न पुन्‍हा विचारला,'' बाळा प्रश्‍न नीट ऐक,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलगी शिक्षकांच्‍या आश्‍चर्यचकित चेह-याकडे पाहत विचार करू लागली मगाशी मी चार उत्तर दिले तर शिक्षक आश्‍चर्यात पडले आता असे काय उत्तर द्यावे जेणेकरून ते खुश होतील. तिच्‍या डोक्‍यात असा विचार जरा सुद्धा स्‍पर्शून गेला नाही की खरे उत्तर द्यावे तिला फक्त असे वाटत होते आपल्‍या उत्तराने शिक्षक खुश झाले पाहिजेत. ती पुन्‍हा बोटे मोजू लागली व तिने उत्तर दिले, '' सर चार पेरू माझ्याकडे असतील.'' आता शिक्षक निराश झाले व विचार करू लागले की या मुलीला बहुधा पेरू आवडत नसावेत म्‍हणून ती चुकीचे उत्तर देत आहे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न बदलून विचारायचे ठरवले . बाळा समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्‍हा एक चिकू दिला तर तुझ्यापाशी किती चिकू होतील?'' मुलीने परत बोटे मोजली व उत्तर दिले,'' सर तीन चिकू असतील माझ्याकडे'' शिक्षकांना याची मोठी गंमत वाटली कि तीन वेळेला चुकीचे उत्तर देणारी मुलगी चौथ्‍या वेळेला कशी काय बरोबर उत्तर देते. त्‍यांना वाटले की आता या मुलीला गणिताची गंमत कळाली. म्‍हणून त्‍यांनी परत आपला पहिलाच प्रश्‍न रिपीट केला,''समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मागच्‍या वेळचे उत्तर बरोबर आल्‍याने मुलीचा आत्‍मविश्‍वास आता वाढला होता तिने फारसा वेळ न दवडता उत्तर दिले, '' सर माझ्याकडे चार पेरू असतील'' हे चुकीचे उत्तर ऐकून शिक्षक संतापले व तिच्‍या दिशेने जात जोरात ओरडले,'' तुला काही डोक्‍याचा भाग वगैरे आहे की नाही, जरा मला पण सांग की चार पेरू कसे काय होतील तुझ्याकडे''. सरांना असे रागावलेले पाहून ती छोटीसी मुलगी रडू लागली, *डोळ्यातून अश्रुंच्‍या धारा वाहत* असतानाच ती मुलगी दप्‍तर शोधू लागली, *दप्‍तरात हात घालून तीने दप्‍तरातील एक पेरू काढून* शिक्षकांना म्‍हणाली,'' सर तुम्‍ही मला *तीन पेरू देणार आहात आणि माझ्याकडचा एक पेरू मी त्‍यात मिसळत गेले* त्‍यामुळे सर मी चार पेरू हे उत्तर देत होते.'' *तात्‍पर्य :-* आपले ही असेच होते ना. ब-याचदा, समोरच्‍याकडून जर अनुकुल प्रतिसाद आला नाही तर आपण आपला संयम गमावून बसतो पण त्‍याची बाजू काय आहे हे आपण कधीच समजून घेत नाही. त्‍याचा त्‍यापाठीमागील तर्क, त्‍यावेळची परिस्थिती, तो ज्‍या संस्‍कृतीमध्‍ये वाढला आहे त्‍याचे संस्‍कार याचा आपण कधीच विचार करत नाही ना. तेव्‍हा जर इथून पुढे कधी जर आपल्‍या मनासारखा प्रतिसाद समोरच्‍याकडून आला नाही तर त्‍याचीही कृपया बाजू समजून घ्‍या. काय सांगावे त्‍याच्‍याजवळ असणारा तो छुपा पेरू आपल्‍याला दिसतही नसेल कदाचित. 👆💐शब्दगंधासह...👏👆

Story 10

♡ एक सुंदर लव्ह स्टोरी आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची ♡ फौजी :- मी सीमेवर युद्धासाठी चाललो आहे, जर मी परत येऊ नाही शकलो तर तू दुसर्या मुलाशी लग्न कर...आणि सुखी रहा. .... त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघून हसायला लागते) फौजी :- माझा विश्वास नाही बसत ........ तू हसतेस ???? प्रेयसी बोलते :- एक वेडा मुलगा रस्त्याने चालला होता, तो कधी डावीकडे पळायचा, तर कधी उजवीकडे पळायचा, कधी मागे पळायचा तर कधी पुढे पळायचा, मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंच उडी मारायचा.... हे बघून लोकांनी त्याला विचारले,"हे तू काय करत आहेस?" तेव्हा तो म्हणाला, "अहो बघाना केव्हा पासून हि सावली माझा पाठलाग करत आहे, मी जिथे जाईल तिथे येत आहे, मी कितीही प्रयत्न केला तिच्या पासून दूर पळण्याचा तरीही ती मला सोडत नाहीये.. असे म्हणून त्याने पुन्हा एक उडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन मरण पावला पण तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर होती. एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठ करून उभी राहते, तिचे हसणे बंद होते आणि मग म्हणते ............."अरे वेड्या, अशी मी ही तुझी सावली आहे रे.!!!! तू माझ्या आईच्या (देशाच्या) रक्षणासाठी जातोस मी पण तुझी विधवा बनून तुझ्या आईबाबांची सेवा करीन आयुष्यभर पण तुझी साथ कधी सोडणार नाही रे !!!! एवढे प्रेम करते रे वेड्या तुझ्यावर कसा प्रवास असेल ना एका फौजीचा , त्याच्या बहीणचा , बायकोचा , मित्रांचा आणि परीवाराचा ??? किती उपकार आहेत ना त्यांचे आपल्यावर !!!!!! ??? जय हिंद जय जवान जय महाराष्ट़..!! एक लाइक आपल्या Indian Army साठी तर बनतोच..!! .

Story 11

.दररोज फक्त एवढेच करा! दुःख ----- Delete आनंद ----- Save नाते ----- Recharge मैत्री ----- Download शत्रुत्व ----- Erase खरे ----- Brodcast खोटे ----- Switch Off तणाव ----- Not Reachable प्रेम ----- Incoming दुस्वास ----- Outgoing हास्य ----- Inbox अश्रू ----- Outbox राग ----- Hold स्मितहास्य ----- Send मदत ----- Ok मन ----- Vibrate मग बघा आयुष्यातील "RING TONE किती मधुर वाजते ते..... 💐💐💐 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा...!💐💐💐

Story 12

*आयुष्यभराची प्रतिष्ठा* महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.? कृष्णाने उत्तर दिले. ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. *रुक्मिणीने विचारले..* *कोणते पाप.?* कृष्ण म्हणाला. जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. *रुक्मिणीने विचारले.* *मग कर्णाचे काय.?* कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही. पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला. *तात्पर्य तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!! *चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.* 🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु

Story 13

एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. s जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!